Adham

अधम: प्रेम आणि सूडाची कहाणी…

Share

“अधम” २८ जूनला प्रदर्शित होणारा आगामी मराठी चित्रपट आहे. या बहु-प्रतिक्षित चित्रपटासाठी जंगली रमी अधिकृत गेमिंग पार्टनर झाल्यामुळे आम्हाला अभिमान वाटत आहे. अधममधून अभिषेक केळकर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भन्नाट अनुभव असणार आहे.

चित्रपटाची कथा विकी नावाच्या अनाथ मुलाभोवती फिरते, जो अण्णा भोसलेचा खास माणूस आहे, अण्णा भोसले हा पुण्यातील खाण माफीयांचा मोठा नेता आहे. बर्‍याच वर्षांपासून विकी हा अण्णाचा विश्वासू गुंड आहे… जो कुणी त्याचा गॉडफादर अण्णाला आडवा जातो, त्याला विकी आडवा करतो.

कथेला एक रोमांचक वळण मिळतं जेव्हा विकीला नंदिली आवडू लागते, नंदिनी ही त्या भागातील खाण-विरोधी चळवळीतील एक प्रमुख सदस्य आहे. ज्या मुलीवर तो प्रेम करतो अण्णा त्याच मुलीला मारायला सांगतो, आता विकीला निवड करायची आहे की तो त्या मुलीला वाचवेल की अण्णाचा गुंड बनून राहिल.

Adham Movie

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे, हा ट्रेलर काही वेळातच अगदी टॉपला ट्रेंड होत आहे आणि प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

ट्रेलर बघूनच आपल्याला कळतं या चित्रपटाची कथा खाणीच्या शहराभोवती आणि भागात हे माफीया आपलं राज्य चालवतात त्या शहराभोवती गुंफलेली आहे.

अधमच्या टीममध्ये आहेत निर्माते तुषार अनिल खांडगे, सचिन अनिल खांडगे, दत्तात्र्येय भडले आणि सुरेश भडले.

पकडून ठेवणारी कथा, सर्व कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि रोहित नागभिडे यांच्या सुमधूर संगीतामुळे अधम हा मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर चित्रपट ठरणार आहे. २८ जून २०१९ रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात अधम पाहायला विसरु नका. 

Rate this post