शिका रम्मीची मनोरंजक विभिन्नता

Share

आपली कौशल्ये तपासून घेण्यासाठी रम्मी हा एक मनोरंजक खेळ आहे. या खेळाचा नियमित सराव करुन तुम्ही खेळामध्ये निपूण होऊ शकता. खेळाचा नियम अतिशय साधा व मूलभूत आहे आणि दोन्ही बाजूने खेळून तुम्ही सहज या खेळावर प्राविण्य मिळवू शकता. आमच्याकडे संपूर्ण वर्णनात्मक ट्यूटोरियल (शिकवणी/मार्गदर्शक) विभाग आहे जिथे तुम्हाला रम्मीच्या खेळाबद्दल एक विस्तृत आढावा घेता येईल.

रम्मीचे अनेक प्रकार आहेत जे जगभरात खेळले जातात. सर्व प्रकारात पत्ते घेणे आणि पत्ते फेकणे अशा मूलभूत नियमाचे पालन केले जाते; प्रत्येक प्रकारात नियमांमध्ये काही किरकोळ बदल असतात. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खेळाबद्दल असलेले प्रेम पाहता रम्मी या खेळाची लोकप्रियता सहज दिसून येते. रम्मीची भारतीय आवृत्ती म्हणजे १३ पत्त्यांचा प्रकार आहे. जंगली गेम्समध्ये आपण भारतीय रम्मीचे विविध प्रकार आणि त्याचबरोबर २१ पत्त्यांचे प्रकार होस्ट करतो. खेळाच्या ऑनलाईन व्हर्जनला खूप लोकप्रियता मिळत आहे आणि जंगली रम्मीमध्ये होस्ट केलेल्या ऑनलाईन रम्मी टूर्नामेंटसाठी लोक अधिकाधिक नोंदणी करत आहेत.

जंगली रम्मीमध्ये होस्ट केलेल्या १३ पत्ते आणि २१ पत्ते प्रकारांशिवाय कॉंट्रॅक्ट रम्मी, रम्मी ५००, शांघाय रम्मी इ प्रकार जगाच्या विविध भागांमध्ये खेळले जातात. काही प्रमुख रम्मी प्रकारांचे वर्णन खाली दिले आहे.

कॉंट्रॅक्ट रम्मी

कॉंट्रॅक्ट रम्मी हा रम्मीचा एक महत्वाचा प्रकार आहे जो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो, जसे ’व्हाईल्ड रम्मी, ’जोकर रम्मी’ इ. कॉंट्रॅक्ट रम्मीची उत्पत्ती जिन रम्मीपासून झाली आहे असे मानले जाते आणि या प्रकाराचे नियम जिन रम्मीसारखेच आहेत. खेळाच्या या प्रकारात वाईल्ड कार्ड जोकर्ससोबत इन-डेक प्रिंटेंड जोकरचा वापर केला जातो.

कॉंट्रॅक्ट रम्मीमध्ये सात डील्स आहेत आणि डील्सशी संबंधित नियम प्रत्येक डील्सनुसार बदलतात. खेळाच्या पहिल्या चार डील्समध्ये खेळाडूंना १० पत्ते दिले जातात आणि शेवटच्या ३ डील्ससाठी १२ पत्ते दिले जातात. खेळाचा उद्देश सर्व रम्मी खेळासारखाच आहे, ज्यामध्ये डील केलेल्या हातात सेट आणि क्रम तयार करायचा असतो. प्रत्येक डीलसाठी आवश्यक गोष्टी (करार) आहेत. खाली खेळासाठी आवश्यक असलेले वेगवेगळे प्रकार दिले आहेत.

१. ३ पत्त्यांचे दोन सेट

२. ३ पत्त्यांचा एक सेट आणि ४ पत्त्यांचा क्रम

३. ४ पत्त्यांचे दोन क्रम

४. ३ पत्त्यांचे तीन सेट

५. ३ पत्त्यांचे दोन सेट आणि ४ पत्त्यांचा एक क्रम

६. ३ पत्त्यांचा एक सेट आणि ४ पत्त्यांचे दोन क्रम

७. ४ पत्त्यांचे तीन क्रम (डिस्कार्ड नाही/पत्ते फेकू नये)

शांघाय रम्मी

शांघाय रम्मी हा रम्मीचा अजून एक प्रमुख प्रकार आहे. ४ खेळाडू असतील तर खेळताना पत्त्यांचे २ डेक वापरले जातात आणि ५ पेक्षा जास्त खेळाडूंसाठी ३ डेक वापरले जातात. कॉंट्रॅक्ट रम्मीच्या अगदी उलट, शांघाय रम्मीमध्ये खेळण्यासाठी १० डील्स आहेत आणि १० हातांचे नियम वेगळे आहेत.

शांघाय रम्मीचे गेमप्ले देखील इतर रम्मी खेळांसारखेच आहे आणि प्रत्येक खेळाडूला ११ पत्ते दिले जातात. सेट आणि क्रम तयार करण्यासाठी पत्ते घेणे आणि फेकणे गरजेचे असते. इथे पत्ते “खरेदी” हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे, जिथे तुमची पाळी नसताना सुद्धा तुम्ही पत्ते हलवू शकता. एका हातासाठी कमाल खरेदी फक्त २ आहे.

शांघाय रम्मीमध्ये वैध असलेले विविध प्रकारचे क्रम खाली दिले आहेत:

१. २ एक्के (एसेस) आणि ३ पत्त्यांचा सेट

२. ३ पत्त्यांचे २ सेट

३. ३ पत्त्यांचा १ सेट आणि ४ पत्त्यांचा क्रम

४. ३ पत्त्यांचे २ क्रम

५. ३ पत्त्यांचे ३ सेट

६. ३ पत्त्यांचे २ सेट आणि ४ पत्त्यांचा १ क्रम

७. ३ पत्त्यांचा १ सेट आणि ४ पत्त्यांचे २ क्रम

८. ४ पत्त्यांचे ३ क्रम

९. ७ पत्त्यांचा १ क्रम आणि ३ पत्त्यांचा १ सेट

१०. ५ पत्त्यांचा १ क्रम आणि ६ पत्त्यांचा १ क्रम

जर तुम्ही खरे रम्मी प्रेमी असाल तर, जागतिक स्तरावर खेळल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या रम्मीबद्दल आपल्याला संपूर्ण कल्पना असल्यास हा एक जास्तीचा फायदा ठरु शकेल. तुम्ही नेहमी रम्मीचे विविध प्रकार खेळण्याचा प्रयत्न करु शकता, जे आम्ही खेळाच्या विविधतेशी ओळख होण्यासाठी आमच्या टेबलवर सादर करतो. जंगली रम्मीमध्ये होस्ट केलेल्या खेळांबद्दल आपल्याला आणखी माहितीची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा: [email protected]  

Rate this post